प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

 भारत हा असा देश आहे जिथे माता आणि बालकांच्या आरोग्याला नेहमीच पुर्वीपासून प्राधान्य दिले गेलेल आहे. तरीही मात्र, आजही ग्रामीण आणि गरीब भागात भारतात अजूनही अनेक काही अशा माता गर्भावस्थेत व बाळंतपणानंतर योग्य पोषक आहार आणि वैद्यकीय सुविधांपासून नेहमीच वंचित राहतात. या समस्येला कमी करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) सुरू केली. १ जानेवारी २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेची घोषणा केली व ती देशभरातील गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी हा एक खूप मोठा आशेचा किरण होणार आहे. जेणेकरून त्या मातांना व बाळांना पोषनाही व आरोग्याची काळजी घेता येईल. या योजनेचा उद्देश असा आहे की भारतातील प्रत्येक गर्भवती मातेला आर्थिक आधार मिळावा, व ती स्वतःची आणि आपल्या बाळाची देखील काळजी घेऊ शकेल. 

➤ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना म्हणजे काय? 

प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना केंद्र सरकारची महिलांसाठी एक कल्याणकारी योजना आहे, जी गर्भवती माता आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर ५,००० रुपये रक्कम रोख दिली जाते. ही रक्कम त्या गर्भवती मातांना तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.  पहिला हप्ता हा गर्भधारणेच्या नोंदणीवर, तर दुसरा गर्भावस्थेतील तपासणीनंतर आणि तिसरा बाळाच्या जन्मानंतर. ही योजना खासकरून अशा महिलांसाठी  आहे ज्या गरीब कुटुंबातून येतात आणि ज्यांना मोलमजुरीवर अवलंबून राहावे लागते व जिथे पोषण आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकारची एक खूप महत्वाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्यामुळे गरीब महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 

➤ योजनेचा मूळ उद्देश 

या योजनेचा मुख्य हेतू हा आहे कि माता व बालमृत्यू दर कमी करणे. भारतात अजूनही काही  ठिकाणी गर्भवती मातांना पुरेसे पोषण मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांना गर्भावस्थेत असतांना आरोग्य तपासणी, लसीकरण व पोषक आहार घेण्यासाठी प्रोत्साहन देते. तसेच, काम करणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब महिलांना महिलांना मजुरी गमावण्याची भीती न ठेवता विश्रांती घेता येणार आहे. 

➤ कसा व काय होणार लाभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)

१. आर्थिक मदत पहिल्या बाळासाठी गर्भवती मातेच्या बँक खात्यात ५,००० रुपये थेट जमा होतील.

२. आरोग्य सुधारणा: गर्भवती मातेची नियमितपणे तपासणी होईल व लसीकरणासाठी मदत होईल.

३. महिलांचे सशक्तीकरण: या योजनेच्या आर्थिक मदतीमुळे गर्भवती मातांना स्वतःच्या आणि बाळाच्या काळजीसाठी निर्णय घेण्याची क्षमता येईल.

➤ या योजनेसाठी लागणारे आवश्यक असलेली  कागदपत्रे

PMMVY चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. ही कागदपत्रे सरकारला तुमची ओळख, पात्रता व बँक खाते याची खात्री करण्यासाठी आवश्यक आहेत. 

१. आधार कार्ड (Aadhaar Card)

आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे कागदपत्र या योजनेचे आहे. अर्जदाराचे (म्हणजेच गर्भवती मातेचे) आधार कार्ड असणे बंधनकारकच आहे, कारण आधार कार्डमुळे तुमची ओळख पटणार व पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर प्रथम नजीकच्या आधार केंद्रातून ते काढून आणावे लागेल.

२. बँक खाते तपशील (Bank Account Details)

या योजनेंतर्गत पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे स्वतःच्या नावाचे बँक खाते असणे अत्यावश्यक आहे. बँक  पासबुक किंवा चेकबुकचा फोटो व खाते क्रमांक, IFSC कोड यांसारखी माहिती अर्जासोबत जोडन्यासाठी लागते.

३. गर्भधारणेचा पुरावा (Proof of Pregnancy)

तुम्ही गर्भवती असल्याचा पुरावा देण्यासाठी तुम्हाला रुग्णालयातून माता आणि बाल संगोपन कार्ड  किंवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार. हे कार्ड जवळपासच्या अंगणवाडी केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून तुम्हाला सहज मिळते. यात तुमच्या गर्भधारणेची नोंद असते.

४. जन्माचा दाखला (Birth Certificate)

तिसरा हप्ता मिळवण्यासाठी बाळाच्या जन्माचा पुरावा लागणार म्हणून त्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटलकडून डिस्चार्ज कार्ड द्यावे लागते. हे बाळाच्या जन्मानंतर गर्भवती महिलेला मिळते. 

 

Previous Post Next Post