मोटरसायकलप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी Hero MotoCorp ने त्यांची नवीन मोटरसायकल, नवी XPulse 210, बाजारात आणली आहे. ही बाइक म्हणजे शेतीशाली इंजिन आणि स्टायलिश डिझाईन हे एक आहे. जर तुम्ही ऑफ रोडर असाल किंवा खूप जास्त लांबचचा प्रवास करणारे असाल तर ही बाईक तुमच्यासाठी आहे कारण याच्यात तुम्हाला एक मजबूत बिल्ड क्वालिटी मिळते, स्टायलिश बाइक शोधत असाल, तर ही XPulse 210 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. कारण ही बाइक XPulse 200 ची पुढची पायरी आहे, ज्यात तुम्हाला अनेक नवीन फीचर्स, व अधिक शक्तिशाली इंजिन आणि आकर्षक डिझाइन आहे.
XPulse 210
XPulse 210 हि बाईक एक नवीन तरुण पिढीची बाइक आहे. XPulse 210 ही Hero MotoCorp या कंपनीची बाईक आहे. जी Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये लॉन्च झाली. ही बाइक XPulse 200 4V ची नेक्स्ट जनरेशन आहे आणि जी ऑफ रोडर व लांब प्रवास चालवणाऱ्या रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हि डिझाइन केलेली आहे. ही बाइक दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. बेस आणि टॉप - आणि चार आकर्षक रंगांमध्ये देखील ती उपलब्ध असणार. Wild Red, Glacier White, Azure Blue आणि Alpine Silver. या बाइकची किंमत साधारणतः 1.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ही किंमत तिच्या फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या तुलनेत खूपच चॅन व दमदार आहे. XPulse 210 ही एक ड्युअल-स्पोर्ट बाइक आहे, याच कारण म्हणजेच ती रस्त्यावर देखील आणि ऑफ-रोड वर देखील अशा दोन्ही ठिकाणी उत्तम काम करते. ही बाइक डाकार रॅलीच्या बाइक्सपासून प्रेरणा घेऊन बनवली आहे, ज्यामुळे ती तुम्हाला खड्डे, दगड आणि खराब रस्त्यांवरही सहज चालवता येते. Hero MotoCorp च्या रॅली चॅम्पियन रॉस ब्रँच यांनी या बाइकच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाची व मोठी भूमिका बजावली आहे, ज्यामुळे XPulse 210 ची ऑफ रोड क्षमता जास्त वाढली आहे.
➤ डिझाइन आणि लूक
आकर्षक आणि मजबूत डिझाइन आहे. XPulse 210 चे डिझाइन जर तुम्ही पाहिलं की तुम्हाला तिची ताकद आणि आकर्षक दिसणं दोन्ही जाणवेल. तिचा उंच फ्रंट बीक, व मोठं फ्लायस्क्रीन, नवीन फ्यूल टँक पॅनल्स व सिंगल पीस सीट तिला देण्यात आलं आहे, हाच तिला आक्रमक आणि साहसी लूक मिळतो. तिचं अपस्वेप्ट एक्झॉस्ट व नकल गार्ड्स तिला ऑफ रोडिंगसाठी खास बनवतात. या बाइकमध्ये तुम्हाला फुल LED लायटिंग आहे, ज्यामध्ये तुम्हाला गोलाकार हेडलॅम्प, LED टर्न इंडिकेटर्स व टेल लॅम्पचा समावेश आहे. जे तुम्हाला रात्रीच्या वेळी उत्तम उजेळ देते.
➤ रंग आणि व्हेरिएंट्स
या बाइकचे तुम्हाला चार रंगांचा पर्याय मिळतो, जे प्रत्येक बाईक प्रेमींना आवडतील असे आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये तुम्हाला Wild Red व Glacier White उपलब्ध आहेत, तर टॉप व्हेरिएंटमध्ये Azure Blue व Alpine Silver मिळतात. रंगांमुळे ती तरुणाईला आकर्षित करतील आणि रस्त्यावरही तिची वेगळी ओळख निर्माण करेल अशी आशा Hero MotoCorp ने व्यक्त केली आहे.
➤ इंजिन आणि परफॉर्मन्स (Engine and Performance)
XPulse 210 मध्ये तुम्हाला शक्तिशाली 210cc इंजिन मिळते. हे तिचं 210cc सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन Karizma XMR 210 मधून घेतलं गेलं आहे, पण यात तुम्हाला थोडी ट्यूनिंग करण्यात आलेली आहे. हे इंजिन तुम्हाला 24.6PS पॉवर आणि 20.7Nm टॉर्क जनरेट करते, जे XPulse 200 पेक्षा खूपच जास्त मिळते. यात तुम्हाला 6-स्पीड गिअरबॉक्स आहे, ज्यामुळे तुम्हाला हायवेवर राइडिंग करतांना स्मूथ परफॉर्मन्स मिळतो. यात रायडरसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे, कि लिक्विड कूलिंगमुळे इंजिन जास्त गरम होत नाही आणि हे तुम्हाला लांबच्या प्रवासाठी उत्तम आहे .
➤ ऑफ रोड आणि ऑन-रोड परफॉर्मन्स (Off-Road and OnRoad Performance)
ही बाइक खासकरून ऑफ-रोडिंगसाठी खास तयार केली आहे. यात तुम्हाला 220mm ग्राउंड क्लीयरन्स व 21 इंच फ्रंट व्हील दिलें गेलं आहे. आणि 18 इंच रिअर व्हील तिला खडबडीत रस्त्यांवर चालवतांना तुम्हाला कसलीही अडचण होऊ देणार नाही व सहज चालवता येणार. तिची सस्पेंशन सिस्टम 210mm ट्रॅव्हल असलेली टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आहे, आणि 205mm ट्रॅव्हल असलेली प्रीलोड ॲडजस्टेबल मोनोशॉक आहे. जे तुम्हाला खड्डे आणि उंच, चिखल आणि सखल रस्त्यांवर आरामदायी राइड देते. ऑन रोडही ती तेवढीच चालवायला स्मूथ आहे, खासकरून 6 स्पीड गिअरबॉक्समुळे हायवेवर चांगली स्पीड मिळतो.
➤ फीचर्स आणि टेक्नॉलॉजी (Features and Technology)
XPulse 210 मध्ये अनेक नवीन आधुनिक फीचर्स आहेत जे रायडिंगचा अनुभव वाढवतील. यात 4.2-इंच TFT डिस्प्ले मिळणार आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सुद्धा सपोर्ट करतो. या डिस्प्लेद्वारे तुम्हाला कॉल आणि SMS अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन व राइडिंग डेटा मिळतो. याशिवाय, यात तुम्हाला राइड बाय वायर थ्रॉटल, राइडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि तीन ABS मोड्स देखील मिळतात (रोड, ऑफ रोड आणि रॅली) यासारख्या सुविधा आहेत. यात तुम्हाला USB Type-C चार्जिंग पोर्ट हे देखील महत्वाचं आणि आणखी एक उपयुक्त फीचर मिळतं.
➤ सुरक्षितता (Safety)
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, यात तुम्हाला XPulse 210 मध्ये फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स मिळतात, जे ड्युअल चॅनल ABS आहेत. हे ABS मोड्स तुम्हाला रायडिंगच्या वेळेस रस्त्याच्या परिस्थितीनुसार ब्रेकिंग कंट्रोल देतात. यामुळे हि बाईक ऑफ रोडिंगदरम्यानही बाइक सुरक्षित राहते.
➤ फायदे
यात तुम्हाला सर्वात शक्तिशाली इंजिन २१०cc मिळतं. या इंजिनमुळे तुम्हाला ऑफ रोड आणि हायवेवर उत्तम परफॉर्मन्स मिळतो .
यात तुम्हाला आधुनिक फीचर्स TFT डिस्प्ले मिळते, जे तुम्हाला राइडिंग मोड्स आणि ABS मोड्स व इतर खूप साऱ्या सेटिंग मिळतात. यामुळे तुमची राईड अधिक सोपी व सुरक्षित होते .
यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याची परवडणारी किंमत, या सेगमेंटमधील इतर बाइक्सच्या तुलनेत या बाईकची किंमत अधिक परवडणारी आहे.
सर्व्हिस नेटवर्क Hero चं मोठं सर्व्हिस नेटवर्क असल्याने मेंटेनन्स सोपं.
➤ तोटे
१६८ किलो वजन आहे या बाइकच काही नवीन रायडर्सना नक्कीच जड वाटू शकतं.
Hero MotoCorp कडून सांगण्यात येत आहे कि तुम्हाला 40 kmpl मायलेज मिळू शकतो, पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, यापेक्षा जास्त अपेक्षित होतं.
सुरुवातीची किंमत XPulse 200 पेक्षा 24,000 रुपये जास्त किंमत काहींना महाग वाटू शकते.
➤ 210 ची स्पर्धा
XPulse 210 चे प्रतिस्पर्धी Kawasaki KLX230, Royal Enfield Himalayan 450, KTM 250 Adventure आणि Suzuki V-Strom SX आहेत. पण या बाइक्सच्या तुलनेत XPulse 210 ची किंमत कमी आहे आणि Hero चं सर्व्हिस नेटवर्क हे कानाकोपऱ्यात आहे, हे तिचं मोठं वैशिष्ट्य आहे. Himalayan 450 आणि KTM 250 ची किंमत जास्त असल्याने XPulse 210 ही बजेटमध्ये बसणारी उत्तम ऑफ-रोड बाइक ठरते.
➤ रायडिंगचा अनुभव (Riding Experience)
XPulse 210 ची पहिलीच राइड घेतल्यावर तुम्हाला तिची ताकद आणि स्मूथनेस लगेच जाणवते. ऑफ रोडिंगदरम्यान तिची सस्पेंशन सिस्टम व ग्राउंड क्लीयरन्स खूपच प्रभावी वाटते. कारण खड्ड्यांवरून जाताना बाइक स्थिर राहते व हायवेवर तिचा 6 स्पीड गिअरबॉक्स स्मूथ शिफ्टिंग मिळतो. TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशनमुळे लांबच्या प्रवासातही कोणतीच अडचण येणार नाही. एकंदरीत,हि बाईक रोजच्या वापरासाठी सुद्धा परफेक्ट आहे.
कोणासाठी योग्य?
ही बाइक लांबच्या राइड्स करणाऱ्यांसाठी आणि ऑफ-रोडिंग करणाऱ्यांसाठी नवीन रायडर्ससाठी उत्तम आहे. तिचं वजन आणि उंची काही नवशिक्यांना अवघड वाटू शकते, पण थोड्या सरावाने ती हाताळणं सोपं होईल.