47 लाखाच्या Skoda Kodiaq च्या किमतीत एक करोडच्या Volvo XC९० गाडीची मजा घ्या जाणून घ्या काय आहेत फीचर्स?

 भारतीय कार बाजारात स्कोडा नेहमीच आपल्या स्टायलिश व दमदार वाहनांसाठी ओळखली जाते. अशीच स्कोडा कोडियाक २०२५ ही त्यांची नवीन अपडेटेड कार येत आहे, जी आपल्या स्टायलिश डिझाइन, व आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात धूम हवा करण्यासाठी सज्ज आहे. ही दुसऱ्या जनरेशनमधील कोडियाक भारतीय ग्राहकांसाठी खास ठरणार आहे, कारण हि स्थानिकवर पातळीवर असेंमबल  केली गेली आहे व भारतीय रस्त्यांवर उत्तम कामगिरीसाठी डिझाइन केली आहे. स्कोडा कोडियाक ही स्कोडाची फ्लॅगशिप एसयूव्ही कार आहे, जी पहिल्यांदा 2017 मध्ये भारतीय बाजारात दाखल झाली होती . तेव्हापासून ती आपल्या आकर्षक डिझाइन, प्रशस्त इंटिरिअर आणि शक्तिशाली परफॉर्मन्समुळे ग्राहकांना आवडली होती. पहिल्या जनरेशन कोडियाकने टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, फोर्ड एनडीवर आणि जीप मेरिडियन यांसारख्या स्पर्धकांना जबरदस्त टक्कर दिली होती. परत आता 2025 मॉडेलसह स्कोडाने आपली ही फ्लॅगशिप एसयूव्ही आणखी उपडेट केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला नवीन डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित इंजिनचा समावेश आहे.

➤ नवीन डिझाइन

2025 स्कोडा कोडियाक मॉडर्न डिझाइन तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे स्कोडाच्या नवीन वाहनांमध्ये दिसून येते. या डिझाइनमुळे कोडियाकला एक आधुनिक आणि शक्तिशाली लूक मिळाला आहे, जो शहरी आणि ऑफ-रोड दोन्ही ठिकाणी तितकाच प्रभावी दिसणार आहे.

➤ एक्सटेरियर डिझाईन 

2025 स्कोडा कोडियाकची बाह्य डिझाइनमध्ये यावेळेस नवीन षटकोनी 'बटरफ्लाय' ग्रिल दिलेली आहे, ज्याचा आकार मागच्या मॉडेलपेक्षा मोठा दिसतो . स्लिमर स्प्लिट मॅट्रिक्स LED हेडलाइट्स व दोन्ही बाजूला जोडणाऱ्या LED स्ट्रिप्समुळे गाडीचा अजून आधुनिक आणि आकर्षक लूक दिसेल. 

                                                                                               Know More About Car

                  Read More टाटा ने केली ही 500 km रेंज असणारी 4x4 Ev Suv लाँच किंमत फक्त एवढी.

➢ हेडलॅम्प्स - यावेळेस तुम्हाला LED बीम क्रिस्टालिनियम हेडलॅम्प्स गाडी अनलॉक करताना वेलकम इफेक्ट देतील, ज्यामुळे तुमच्या रात्री गाडीचे स्वरूप अधिक आकर्षक दिसणार.

➢ अलॉय व्हील्स - स्कोडा कोडियाकमध्ये तुम्हाला 18-इंच अलॉय व्हील्स दिले आहेत, जे गाडीला आणखी स्पोर्टी व प्रीमियम लूक देतात. स्पोर्टलाइन व्हेरिएंटमध्ये तुम्हाला अधिक आक्रमक डिझाइन दिली आहे, व L&K व्हेरिएंटमध्ये शांत व शोभवंत अलॉय व्हील्स आहेत.

➢ टेल लॅम्प्स - टेल लॅम्प्स तुम्हाला C-आकाराचे LED दिले आहेत, व संपूर्ण रुंदीवर पसरलेली डेकोरेटिव्ह स्ट्रिप गाडीच्या मागील बाजूस क्रिस्टलाइन इफेक्ट देतात, जे रात्री खूपच सुंदर दिसते.

➤ रंग पर्याय

2025 कोडियाक तुम्हाला सात रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. मून व्हाइट, मॅजिक ब्लॅक, ग्रॅफाइट ग्रे, वेल्वेट रेड, रेस ब्लू, ब्रॉन्क्स गोल्ड (फक्त L&K साठी) आणि स्टील ग्रे (केवळ स्पोर्टलाइन साठी). मून व्हाइट व रेस ब्लू हे रंग अनुक्रमे L&K आणि स्पोर्टलाइन व्हेरिएंट्सवर दिले जाणार.

स्कोडा कोडियाक व्हेरिएंट्स 

1) स्पोर्टलाइन - यात तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक हायलाइट्स, ब्लॅक ग्रिल, ब्लॅक ORVM व स्पोर्टी अलॉय व्हील्स मिळणार, ज्यामुळे कोडियाकचा तरुण आणि डायनॅमिक लुक दिसेल.

२) लॉरिन अँड क्लेमेंट (L&K) -  यात तुम्हाला डार्क क्रोम अॅक्सेंट्स, बेज अपहोल्स्ट्री व वुड लूकसह अधिक प्रीमियम व लक्झरीचा अनुभव घेता येतो.

                                                             Image Credit Skoda Official Site                                                                                           

➤ इंटिरियर

2025 कोडियामध्ये यावेळेस इंटिरियरचा पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. केबिनमध्ये आधुनिक प्रीमियम मटेरियल्सचा वापर केला गेला आहेच, सॉफ्ट-टच सरफेसेस व मेटलिक अॅक्सेंट्सचा वापर करण्यात आला आहे. सात-सीटर सेगमेंटमुळे ही SUV मोठ्या कुटुंबांसाठी सुद्धा उत्तम पर्याय ठरणार आहे.

➢ सीट्स - L&K व्हेरिएंटमध्ये तुम्हाला लेदर अपहोल्स्ट्री व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स दिले आहेत, तर स्पोर्टलाइनमध्ये डायनॅमिक ब्लॅक व रेड स्टिचिंगसह स्यूड लेदर दिले आहे.

➢ बूट स्पेस - सात-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये 270 लिटर बूट स्पेस तुम्हाला यात मिळतो, तर तिसरी रो खाली फोल्ड केल्यास 845 लिटर व दुसरा रो फोल्ड केल्यास 2,005 लिटर स्पेस तुम्हाला यामध्ये मिळते.

                                                                                      Image Credit Skoda Official Site

➤ तंत्रज्ञान व कनेक्टिव्हिटी

कोडियाक २०२५ तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील अग्रेसर आहे. यात तुम्हाला 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले तर 9.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळत, जे वायरलेस अँड्रॉइड ऑटो व ऍपल कारप्ले देखील सपोर्ट करते.

➢ साउंड सिस्टम -  L&K व्हेरिएंटमध्ये 12-स्पीकर कॅन्टन साउंड सिस्टम आहे, जी उत्तम ऑडिओ अनुभव देतो.

➢ वायरलेस चार्जिंग - यात तुम्हाला ड्युअल-झोन वायरलेस चार्जिंग पॅड व टाइप-C पोर्ट्स दिले आहे जे दूरच्या प्रवासादरम्यान चार्जिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे.

➢ स्मार्टलिंक -  स्कोडाची स्मार्टलिंक टेक्नॉलॉजी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी खूप उपयुक्त ठरते.

➤ परफॉर्मन्स 

2025 स्कोडा कोडियाकमध्ये तुम्हाला 2.0-लिटर TSI टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे, जे तुम्हाला 201 बीएचपी पॉवर जनरेट करून देईल व 320 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन गेल्या मागच्या मॉडेलपेक्षा 14 बीएचपी जास्त पॉवर देते. यात तुम्हाला 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व फुल-टाइम 4x4 सिस्टमसह जोडले आहे.जे तुम्हाला (ऑफ रोड) ओबडधोबड रस्त्यांवरही उपयुक्त ठरणार. कोडियाक २०२५ मध्ये तुम्हाला मायलेज 14.86 किमी/लिटर मिळणार आहे, जो ४X४ असूनही या एसयूव्हीसाठी उत्तम आहे.155 मिमी ग्राउंड क्लीयरन्स असून ही कार ऑफ-रोडसाठी सक्षम ठरणार आहे.

➤ ड्रायव्हिंगचा अनुभव

कोडियाकमध्ये ड्रायव्हिंग अनुभव तुम्हाला रिफाइंड व शक्तिशाली मिळेल. 4x4 सिस्टममुळे याला उत्तम ट्रॅक्शनसुद्धा मिळते, तर सस्पेंशन सेटअप हे रस्त्यावरील खड्ड्यांना सहज हाताळते. 

➤ फीचर्स आणि सेफ्टी

➢ 2025 कोडियाकमध्ये  अनेक अत्याधुनिक फीचर्स मिळतात.  

कोडियाकमध्ये तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ मिळते जे प्रवाशांना खुल आणि हवेशीर अनुभव देते. ज्यामुळे प्रवास अधिक मजेशीर होतो. 

यात तुम्हाला 360-डिग्री कॅमेरा मिळतो जो पार्किंग आणि मॅन्युव्हरिंगसाठी उपयुक्त ठरतो.

सर्व प्रवाशांसाठी वैयक्तिक कम्फर्टसाठी तुम्हाला थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल सुद्धा दिले आहे.

स्मार्ट फीचर्स म्हणजे तुम्हाला वायरलेस चार्जिंग, यूएसबी टाइप-सी पोर्ट्स, व स्कोडाच्या ‘सिंपली क्लेव्हर’ फीचर्स म्हणजे डिस्प्ले क्लीनर,आणि अम्ब्रेला होल्डर यांसारखे फीचर्स तुम्हाला फक्त स्कोडातच मिळतात.

➤ सेफ्टी व फीचर्स

सुरक्षेच्या बाबतीत स्कोडाचे ने नाव कुठेही येणार नाही अस होऊच शकत नाही. म्हणून कोडियाक सुद्धा सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. 

कोडियाकमध्ये तुम्हाला 9 एअरबॅग्स ड्रायव्हर व प्रवाशांसाठी सर्वसमावेशक असं संरक्षण देत.

स्कोडा कोडियाकमध्ये २०२५ तुम्हाला ABS, EBD, ESC: असे अत्याधुनिक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स मिळतात, त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. 

ISOFIX चाइल्ड सीट माउंट्सचा सुद्धा पर्याय इथे लहान मुलांना मिळतो. जे वाहत मुलांसाठी सुरक्षितता वाढवता. याव्यतिरिक्त तुम्हाला कोडियाकमध्ये पार्क असिस्ट व ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम असे अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स मिळतात.

टीप - या स्कोडा कोडियाकची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर, फोक्सवॅगन टिगुआन आर लाईन, एम जी ग्लॉस्टर, जीप मेरेडियन आणि ह्युंदाई टुस्कॉन यांच्याशी मोठी स्पर्धा आहे. 

Read More Ktm Duke २५० च्या टक्करला हिरोने आणली आपली शक्तिशाली Hero Xtreme 250r बाईक?









Previous Post Next Post