हुंडई हे नाव आता भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एक प्रतिष्ठित व विश्वसनीय ब्रँड बनलं आहे. त्यांची क्रेटा ही गाडी तर गेल्या काही वर्षांपासून भारतातील मध्यमवर्गीयांची आवडती कार ठरली आहे. पण आता हुंडईने याही पुढे एक पाऊल पुढे टाकत त्यांनी आपली नवीन येणारी बहुचर्चित कार "हुंडई क्रेटा ईव्ही 2025" मध्ये लाँच केली आहे. ही एक इलेक्ट्रिक वाहन (EV) असणार आहे. हि फक्त एक ईव्ही गाडीच नाही, तर पर्यावरणपूरक व आधुनिक तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण सुद्धा आहे. 17 जानेवारी 2025 रोजी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये या ईव्ही कारचे अधिकृत लॉन्चिंग झालं आहे. आणि तेव्हापासूनच ती एक चर्चेचा विषय बनली आहे.आजच्या युगात इलेक्ट्रिक वाहनांचं वाढते महत्व. व पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, प्रदूषण व पर्यावरणाचं संरक्षण या सर्वकाही गोष्टींचा विचार करता, इलेक्ट्रिक गाड्या हा नक्कीच भविष्यात डिझेल-पेट्रोल गाड्यांपेक्षा वरचढ ठरणार आहेत. व भविष्यातील पर्याय ठरत आहेत. आणि हुंडई क्रेटा ईव्हीनेही देखील ही त्याच दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे.
➤ डिझाईन
➤ एक्सटेरियर
हुंडई क्रेटा ईव्हीची आधुनिकता व नवीन आकर्षक डिझाईन ओळख यांचा संगम आहे. हुंडई क्रेटा ईव्हीचे एक्सटेरियर बाहेरून पाहिल्यावर आपल्या आधीच्या क्रेटाशी खूपच साम्य दिसते. पण त्यात मात्र काही खास बदल केले आहेत जे हिला इलेक्ट्रिक वाहन म्हणून वेगळं ठरवतात. सर्वात मोठा बदल तर म्हणजे तिची फ्रंट ग्रिल. नेहमीच्या क्रेटाच्या त्या मोठ्या ग्रिलच्या जागी आता एक नवीन बंद ग्रिल दिली आहे, ज्यामुळे ती खूपच आकर्षक आणि आधुनिक दिसते. या ग्रिलमध्येच एक चार्जिंग पोर्ट देखील लपलेलं आहे, जे एक डिझाईनला एक स्मार्टनेस दाखवत.
या नवीन क्रेटा ईव्हीला 17 इंचीचे नवे Aero Alloy व्हील्स दिले गेले आहेत. हे व्हील्स फक्त स्टायलिशच नव्हेच, तर त्यांचा कमी रोलिंग रेझिस्टन्समुळे क्रेटाची कार्यक्षमता वाढेल. यावेळेस मागच्या बाजूचे नवीन बंपर दिले आहे, व पिक्सल स्टाईल डिटेलिंगमध्ये आहे, जे तुम्हाला हुंडईच्या ग्लोबल पिक्सल डिझाईन लँग्वेजचं प्रतिबिंब ठरत. यावेळेस हुंडईने रंगांच्या बाबतीतही ग्राहकांना अनेक पर्याय दिले आहेत. यात तुम्हाला आठ मोनोटोन व दोन ड्युअल-टोन रंग दिले आहेत, ज्यात एक नवीन "Ocean Blue Metallic with Black Roof" या सर्व रंगांचा पर्याय दिला आहे.
➤ इंटेरियर
क्रेटा ईव्हीच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला जाणवत की हुंडईने यातही नेहमीप्रमाणे आपलं प्रीमियम टच कायम ठेवलं आहे. कारण डॅशबोर्डवर तुम्हाला दोन 10.25 इंची स्क्रीन्स दिल्या आहेत, एक इन्फोटेनमेंटसाठी तर दुसरी ड्रायव्हर डिस्प्लेसाठी. असा ड्युअल स्क्रीन सेटअप आता अनेक प्रीमियम गाड्यांमध्ये दिसून येतात, आणि क्रेटा ईव्हीमध्येही ते छान जुळून आलं आहे. यात तुम्हाला नवीन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील व स्टॉक आधारित गियर सेलेक्टर हि आयॉनिक 5 मधून प्रेरणा घेतली आहे, ज्यामुळे गाडीला एक अशी फ्युचरिस्टिक वाईब येते.
आतल्या बाजूस तुम्हाला दिसेल कि तिथे एक सस्टेनेबल मटेरियलचा वापर केला गेलाय, जे पर्यावरणप्रेमींसाठी एक चांगली गोष्ट आहे. या गाडीत तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स देखील मिळत, पण मात्र हे फक्त पुढच्या दोनच सीट्सवर व्हेंटिलेशन आहे, व ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलमुळे प्रवास अधिक आरामदायी व सोयीस्कर होतो. मध्यभागी दिलेल्या सेंटर कन्सोलचं डिझाईनही यावेळेस नवं आहे, जिथे तुम्हाला कप होल्डर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक व ड्राईव्ह मोड्ससाठी रोटरी डायल सुद्धा मिळेल. हे पाहता, ही गाडी आतून एक प्रीमियम वाटते.
Know More About Car➤ परफॉर्मन्स
➤ बॅटरी व रेंज
हुंडई क्रेटा ईव्ही मध्ये तुम्हाला बॅटरीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत एक 42 kWh व दुसरी 51.4 kWh. 42 kWh बॅटरीची रेंज हि तुम्हाला 390 किलोमीटर देते , तर 51.4 kWh बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तुम्हाला साधारणतः 473 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. हीच रेंज भारतीय रस्त्यांसाठी पुरेशी आहे, मग तो रोजचा प्रवास असो वा वीकेंडचा दूरवरचाप्लॅन. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही गाडी 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 7.9 सेकंदात धावते (51.4 kWh व्हेरिएंट), जे या सेगमेंटमधील इतर गाड्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
➤ सुरक्षितता (Safety)
ह्युंदाईने सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही.
इथे तुम्हाला सहा एअरबॅग्स मिळतात.
➧ ABS सह EBD
➧ रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स
➧ लेव्हल 2 ADAS सिस्टम
➧ इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
➧ हिल स्टार्ट असिस्ट
➧ ADAS मध्ये लेन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल व ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारखे महत्वाचे फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे तुमची ड्रायव्हिंग
अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होते.
➤ तंत्रज्ञान (Technology)
➩ (इन्फोटेनमेंट व कनेक्टिव्हिटी)
तुम्हाला 10.25-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिमसह अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट
व्हॉइस कमांड सिस्टिम
वायरलेस चार्जिंग
V2L (व्हेइकल-टू-लोड)
क्रेटा ईव्हीमध्ये V2L तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे तुम्हाला गाडीच्या बॅटरीचा वापर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्यासाठी येतो. यामुळे कॅम्पिंग किंवा आपत्कालीन परिस्थितीत ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.
➤ किंमत व व्हेरिएंट्स
क्रेटा ईव्हीची किंमत ही 17.99 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती किंमत हि 2४.50 लाखांपर्यंत एक्स शोरूम जाते.
खालील प्रमाणे व्हेरिएंट्स तुम्हाला पहायला मिळतील.
1) एक्झिक्युटिव्ह (Executive) - 42 kWh
2) स्मार्ट (Smart) - 42 kWh
3) स्मार्ट (O) (Smart (O)) - 42 kWh
4) प्रिमियम (Premium) - 42 kWh
5) स्मार्ट (O) लाँग रेंज (Smart (O) Long Range) - 51.4 kWh
6) एक्सलन्स लाँग रेंज (Excellence Long Range) - 51.4 kWh
Read More हॅरियर घ्यावी कि टायगून कोणती असेल तुमच्यासाठी उत्तम कार?