Ktm Duke २५० च्या टक्करला हिरोने आणली आपली शक्तिशाली Hero Xtreme 250r बाईक?

 स्पोर्टबाईक्स जगात नवीन बाइक येणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. आणि जेव्हा ती बाइक हीरो मोटोकॉर्पसारख्या मोठ्या कंपनीकडून लॉन्च होत असेल असेल, तर तेव्हा अपेक्षा आणि उत्सुकता अधिक जास्त होते. हीरोने २०२५ मध्ये आपली नवीन बाइक हीरो एक्सट्रीम २५०R लॉन्च केली आणि ती बाइकप्रेमींच्या मनात घर करायला आली आहे. ही बाइक २५०cc सेगमेंटमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. व  Ktm Duke २५० ला मोठं आव्हाहन द्यायला बाजारात आली आहे. 

 Hero Xtreme 250R ही बाइक पहिल्यांदा EICMA  येथे २०२४ मध्ये प्रदर्शित झाली आणि त्या  नंतर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च झाली. ही एक नेकड स्ट्रीटफायटर बाइक आहे, जी तरुणांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन केलेली आहे. हीरो मोटोकॉर्पने या बाइकद्वारे पहिल्यांदा २५०cc सेगमेंटमध्ये आपलं पाऊल ठेवलं आहे. बजाज पल्सर N250, सुजुकी जिक्सर 250 आणि KTM 250 ड्यूक यांसारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करण्याच आव्हाहन दाखवल आहे. ही बाइक फक्त एक वाहन नाही, तर ती एक स्टायलिश स्टेटमेंट आहे. तिचं आकर्षक व आक्रमक डिझाइन, दमदार इंजिन व आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ती रस्त्यावर एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे. तिच्या आक्रमक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही बाइक बघून असं वाटतं की ही बाईक फक्त  रस्त्यावर रेसिंगसाठीच जन्माला आली आहे. जर तुम्ही बाइकप्रेमी असाल आणि काहीतरी नवीन, शक्तिशाली इंजिन आणि स्टायलिश लुक शोधत असाल, तर ही हीरो एक्सट्रीम 250R फक्त  तुमच्यासाठीच आहे. 

➤ डिझाइन आणि स्टाइल (Design and Style)

हीरो एक्सट्रीम 250R चं डिझाइन म्हणजे तिचं खरं वैशिष्ट्याच मोठं कारण आहे. ही बाइक नेकड स्ट्रीटफायटर स्टाइलमध्ये तयार केली आहे, ज्यामुळे ती रस्त्यावर चालवतांना एकदम वेगळी आणि आकर्षक दिसते. त्याच्यात तुम्हाला हेडलॅम्प, मस्कुलर फ्यूल टँक आणि शार्प टँक एक्सटेंशन्स आणखी तिला एक आक्रमक आणि बोल्ड लूक देतात. तिचं स्वेल्ट टेल सेक्शन आणि फेंडर फ्री डिझाइन तिला मॉडर्न आणि ट्रेंडी बनवतं. त्यामुळे हीरोने या बाइकला तीन रंगांचा  पर्यायांमध्ये लॉन्च केलं आहे. 

➤ हे तीन रंग पर्याय आहेत. 

१) फायरस्टॉर्म रेड (Firestorm Red)

२) स्टेल्थ ब्लॅक (Stealth Black)

३) निऑन शूटिंग स्टार (Neon Shooting Star)

                            Know more about bike

                 Read more टाटाने बाजारात परत आणली, डिस्कन्टीन्यु केलेली कार जाणून घ्या कोणती ?


➢ बिल्ड क्वालिटी आणि फिनिशिंग (Build Quality and Finishing)

या बाइकची बिल्ड क्वालिटी एकंदरीत मजबूत आहे. ती स्टील ट्रेलिस फ्रेमवर तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती मजबूत आणि स्थिर राहते. पण काही बाईक  तज्ञांचं म्हणणं आहे की पेंटची फिनिशिंग आणि स्विचेसच्या प्लास्टिकची गुणवत्ता अधिक सुधारली जाऊ शकते. तरीही, मात्र तिचं डिझाइन आणि बांधणी असं काहीतरी आहे की जे तुम्हाला पहिल्या नजरेत ही बाईक आवडेल. ती 17 इंची अलॉय व्हील्स दिल्या आहेत , ज्यामुळे ती रस्त्यावर अधिक स्थिर धावते.

➢ इंजिन आणि परफॉर्मन्स (Engine and Performance)

हीरो एक्सट्रीम 250R मध्ये २५०cc, लिक्विड-कूल्ड (Liquid Cooled), DOHC, सिंगल-सिलिंडर, 4-व्हॉल्व्ह सिस्टम इंजिन आहे. हे इंजिन तब्बल 9,250 rpm वर 29.5 bhp पॉवर व 7,250 rpm वर 25 Nm टॉर्क जनरेट करते, पण यात लांब स्ट्रोक आणि अनेक आतील बदल करण्यात आले आहेत. ज्यात हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स व स्लिपर क्लचसह जोडलेलं आहे, ज्यामुळे रायडिंग अधिक स्थिर आणि रोमांचक होणार आहे.

 ही बाइक 0 ते 60 (Kmph) किमी/तास वेग फक्त 3.2 सेकंदात धावते, ज्यामुळे ती तिच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान बाइक असल्याचा दावा हीरो करत आहे. . शहरातील ट्रॅफिकमध्येही ती उत्तम काम करत आहे. आणि हायवेवर तर तिची खरी मजा अनुभवायला मिळते. पण काही बाईक तज्ज्ञांना असं वाटतं की फ्रंट ब्रेकची स्टॉपिंग पॉवर आणखी चांगली दिली गेली असती.

➢ डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी (Display and Connectivity)

हीरो एक्सट्रीम 250R मध्ये तुम्हाला  LCD डिस्प्ले दिला आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला पण सपोर्ट करतो. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुद्धा कनेक्ट करून नेव्हिगेशन, कॉल अलर्ट्स व म्युझिक कंट्रोलचा अनुभव घेऊ शकता. पण सध्याच्या काळात जिथे १५२cc बाइक्सवरही TFT डिस्प्ले मिळतात, इथे हीरोने जर TFT स्क्रीन दिली असती तर ते अधिक जास्त उत्तम ठरलं असतं. तरीही, ह्या डिस्प्लेत तुम्हाला लॅप टाइमर, ड्रॅग टाइमर व इतर महत्त्वाची माहिती देखील दाखवतो. खासकरून नेव्हिगेशन फीचर लांब राइड्सवर खूपच कामाचं आहे.

➢ सस्पेंशन आणि ब्रेकिंग

या बाइकमध्ये तुम्हाला 43mm अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स आणि 6 स्टेप अडजस्टेबल रिअर मोनोशॉक सस्पेंशन आहे. हे सस्पेंशन सेटअप मुळे तुम्हाला रस्त्यावर चांगली स्थिरता आणि आराम मिळतो. ब्रेकिंगसाठी फ्रंट आणि रिअर दोन्ही ठिकाणी डिस्क ब्रेक्स आहेत, जे ड्युअल चॅनल ABS सोबत दिले गेले आहेत. तुम्ही रिअर ABS बंदही करू शकता, ज्यामुळे रायडिंगचा थरार आणखी वाढतो.  


Read more टाटा ने केली ही 500 km रेंज असणारी 4x4 Ev Suv लाँच किंमत फक्त एवढी.



Previous Post Next Post