टाटाने बाजारात परत आणली, डिस्कन्टीन्यु केलेली कार जाणून घ्या कोणती ?

टाटा सिएरा हे नाव हे नाव तुम्ही देखील कधीतरी ऐकलं असेल. भारतीय कार बाजारात एक मोठं मानाचं  स्थान होते. १९९१ मध्ये पहिल्यांदा लॉन्च झालेली ही गाडी त्या काळातील एक क्रांतिकारी ऑफ रोड कार होती. आता, जवळपास दोन दशकांनंतर, टाटा या गाजलेल्या नावाला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात बाजारात आणत आहे. २०२५ मध्ये लॉन्च होणारी ही नवीन टाटा सिएरा मॉडर्न डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान आणि टाटाच्या सेफ्टीला एकत्र आणते.  

➤ टाटा सिएरा

टाटा सिएरा हि कार पहिल्यांदा १९९१ मध्ये भारतीय कार बाजारात आणली गेली. ती टाटा टेल्कोलाइन या पिकअप ट्रकवर आधारित होती आणि तीन दरवाजांची स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) म्हणून त्या काळात ओळखली गेली. त्या काळात भारतात खासगी वाहनांचा वापर वाढत होता आणि सिएराने या गरजेला उत्तम प्रतिसाद दिला. २.० लिटर डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह ही गाडी रस्त्यांवरून सहजतेने धावत असे. विशेषतः तिच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या काचेच्या खिडक्या आणि साधी पण मजबूत बिल्ड गुणवत्तेमुळे ती लोकप्रिय झाली. १९९७ मध्ये टर्बोचार्ज्ड आवृत्ती आली, ज्याने तिची शक्ती ८७ हॉर्स पावर वाढवली. पण काळ बदलला आणि स्पर्धेमुळे ही गाडी २००० च्या दशकात बंद झाली. तरीही, तिची आठवण आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. २०२५ मध्ये टाटा मोटर्सने या जुन्या आठवणींना नव्या तंत्रज्ञानासह परत एकदा बाजारात येत आहे. ही टाटा नवीन सिएरा इलेक्ट्रिक (EV) आणि इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल,  डिझेल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही पॉवर्ट्रेनमध्ये लाँच करण्यात येणार आहे. पण आता पेट्रोल व्हेरिएंट देखील येण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्यामुळे ती आजच्या काळातही तेवढीच शक्तिशाली असणार आहे

टाटा सिएरा 2025 ची घोषणा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 जेव्हा केली तेव्हापासून तिच्याबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढतच आहे. ही गाडी 2025 वर्षाच्या मधल्या लॉन्च होण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आणि ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये जीप कंपास, टोयोटा हायरायडर, ह्युंदाई क्रेटा, होंडा एलेवेट, फोक्सवॅगन टायगून, किआ सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटारा यांच्याशी स्पर्धा असणार आहे.

 डिझाईन

➢ एक्सटेरिअर डिझाईन

टाटा सिएरा 2025 चं एक्सटेरिअर डिझाईन हे जुन्या सिएराच्या प्रेमींना आनंद देणारं आहे, पण त्यात आधुनिकता देखील जाणवणार आहे. या गाडीच्या सिल्हूटमध्ये पाहून जुन्या सिएराची आठवण येते, खासकरून तिच्या मोठ्या खिडक्या आणि उंच बॉनेटमुळे. पण मात्र नव्या डिझाईनमध्ये टाटाच्या आधुनिक डिझाईनचा वापर झाला आहे. समोरच्या बाजूला एलईडी लाइट बार, व्हर्टिकल हेडलॅम्प्स आणि एक मजबूत ग्रिल आहे, ज्यामुळे ती आक्रमक दिसणार आहे. दरवाजा उघडण्यासाठी फ्लश डोअर हँडल्स आणि कनेक्टेड एलईडी टेललाइट्स यामुळे तिचा एक प्रीमियम लूक असणार आहे.

➢ इंटिरियर डिझाईन 

सिएराच्या इंटिरियर मध्ये गेल्यावर तुम्हाला एक प्रीमियम आणि टेक-सॅव्ही केबिन दिसणार आहे. यात १२.३ इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि १०.२५ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे, ज्यात तुम्हाला सर्व माहिती एका नजरेत दिसते. चार स्पोक स्टीयरिंग व्हील, अँबियंट लाइटिंग व  पॅनोरॅमिक सनरूफ यामुळे केबिनचा अनुभव यामुळे तुमचा प्रवास आणखी समृद्ध होणार आहे. सीट्स हे उच्च दर्जाच्या मटेरियलने बनवल्या आहेत आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स व पॉवर टेलगेट यासारख्या सुविधा तुम्हाला मिळणार आहे.


➤ कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान (Connectivity and Technology) 
 
टाटा सिएरा २०२५ ही कार  टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अग्रेसर असणार आहे. यात तुम्हाला वायरलेस एप्पल कारप्ले व अँड्रॉईड ऑटो मिळणार आहे, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन सहज कनेक्ट करायला मदत होईल. ओव्र  द एअर (OTA) अपडेट्समुळे तुमच्या गाडीचं सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड राहील. याशिवाय, यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे तुम्ही गाडीचं लोकेशन, स्टेटस आणि बरंचकाही तुमच्या स्मार्टफोनवर पाहू शकणार आहेत. 

➤ सुरक्षितता (Safety)

सुरक्षिततेच्या बाबतीत टाटा बद्दल न बोललेलंच बर, कारण टाटा नेहमीच सुरक्षिततेच्या बाबतीत आघाडीवर असते आणि सिएरा २०२५ याला अपवाद नाही. कारण यात तुम्हाला ६ एअरबॅग्स, ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट आणि ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग सिस्टम आहे. याशिवाय, लेव्हल 2 ADAS (एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आहे, ज्यामध्ये एडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यासारखी फीचर्स दिल्या जाणार आहेत.

➤ कम्फर्ट आणि सुविधा (Comfort and features)

सिएरामध्ये कम्फर्ट आणि सुविधांचा बाबतीतही चांगला विचार केला आहे. यात तुम्हाला पॉवर फ्रंट सीट्स आहे, व्हेंटिलेटेड सेकंड रो सीट्स, वायरलेस फोन चार्जर व  उच्च दर्जाची प्रीमियम साउंड सिस्टम यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. यामुळे तुमचा प्रवास आणखी सोयीस्कर होतो. यात तुम्हाला  ३६० डिग्री कॅमेरा आणि टच बेस्ड AC कंट्रोल्स मिळणार आहेत, जे तुमचा ड्रायव्हिंग कम्फर्ट  वाढवणार आहे .

 परफॉर्मन्स शक्ती आणि कार्यक्षमता (Performance-Power and  ability )

➢ इलेक्ट्रिक व्हर्जन (EV)

टाटा सिएरा EV ही कार टाटाच्या Gen2 EV या प्लॅटफॉर्मच्या आधारावर असणार आहे. आणि Acti.EV आर्किटेक्चरचा वापर करते. यात तुम्हाला 60 kWh ते 80 kWh पर्यंतच्या बॅटरी पर्यायांची शक्यता आहे, ज्यामुळे ती सिंगल आणि ड्युअल मोटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असणार आहे. या गाडीची रेंज सुमारे 500 किमी असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती लांबच्या प्रवासासाठीही उत्तम ठरणार आहे. टॉप स्पीड 160 किमी/तास असण्याची शक्यता आहे. 

➢ ICE व्हर्जन

ICE व्हर्जनमध्ये दोन इंजिन पर्याय असतील:

१.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन: हे इंजिन 170 hp पॉवर आणि 280 Nm टॉर्क देणार, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद रोमांचक होईल.

२.०-लिटर डिझेल इंजिन हे टाटा हॅरियर आणि सफारीमधून घेतलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, जे 170 hp आणि 350 Nm टॉर्क देईल. हे इंजिन तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी आणि हेवी-ड्यूटी वापरासाठी उत्तम ठरणार आहे.

दोन्ही इंजिन्स 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येतील. टाटाने ऍटलास (ATLAS) प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 4x4 क्षमता मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे तुम्हाला ऑफ रोडिंगसाठी ही गाडी कसलीही कमतरता भासू देणार नाही.  

Read More टाटा ने केली ही 500 km रेंज असणारी 4x4 Ev Suv लाँच किंमत फक्त एवढी.

२०२५ च्या मधल्या काळात 

किंमत EV व्हर्जन काहींसाठी महाग ठरू शकतं

इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) 

अंदाजित किंमत २५ लाख रुपये ते ३० लाख रुपये

(पेट्रोल / डिझेल)

अंदाजित किंमत १५ लाख रुपये ते २० लाख रुपये या दरम्यान असू शकते. 

टाटा सिएरा २०२५ ची घोषणा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो २०२५ जेव्हा केली तेव्हापासून तिच्याबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढतच आहे. ही गाडी २०२५ वर्षाच्या मधल्या लॉन्च होण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आणि ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये जीप कंपास, टोयोटा हायरायडर, ह्युंदाई क्रेटा, होंडा एलेवेट, फोक्सवॅगन टायगून, किआ सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कार्स सोबत या टाटा सिएरा कारची स्पर्धा असणार आहे.



Previous Post Next Post