एखादी कार खरेदी करणे हा विषय प्रत्येकासाठी एक खास आणि खूपच विचारपूर्वक घ्यावा लागणारा निर्णय असतो. आजकाल जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) ट्रेंड वाढत आहे, याच कारण असं की कारण पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या किंमती व पर्यावरणाची काळजी. भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसात टाटा मोटर्स व महिंद्रा अँड महिंद्रा या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत अग्रेसर आहेत. टाटा कर्व्ह (Tata Curvv) आणि महिंद्रा BE6 या दोन नव्या इलेक्ट्रिक गाड्या सध्या लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय झाल्या आहेत. टाटा कर्व्ह ही एक कूपे SUV आहे जी खूप स्टायलिश डिझाइन आणि दमदार रेंजसाठी मानली जाते, तर महिंद्रा BE6 ही देखील एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आहे. जी परफॉर्मन्स आणि फीचर्ससाठी स्वतःकडे लक्ष वेधते. पण या दोघांपैकी तुमच्यासाठी कोणती गाडी तुमच्यासाठी योग्य आहे? हे तुम्ही खालील माहिती घेऊन अधिक समजू शकता.
टाटा कर्व्ह
टाटा कर्व्ह हि टाटा मोटर्सची एक इलेक्ट्रिक SUV कूपे गाडी आहे, जी ७ ऑगस्ट २०२४ मध्ये लॉन्च झाली आहे. तिचे कुपे आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स तिला बाजारात तिला एक वेगळी ओळख देतं. टाटा नेक्सॉन EV व टिगॉर EV यानंतर कर्व्ह ही टाटा मोटर्सची नवीन ऑफरिंग आहे, जी मध्यम-वर्गीय ग्राहकांना लक्ष्य करते. तिची बॅटरी रेंज व किंमत यामुळे ती मध्यमवर्गीयांसाठी व कौटुंबिक वापरासाठी उत्तम पर्याय ठरते.
महिंद्रा BE6
महिंद्रा BE6 ही एक महिंद्रा कंपनीची Born Electric म्हणजेच (BE) सिरीजमधील एक गाडी आहे, जी २६ नोव्हेंबर २०२५ मध्ये लॉन्च झाली आहे. ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे जी तुम्हाला दमदार परफॉर्मन्स, आधुनिक तंत्रज्ञानासह ऑफ-रोड क्षमतेसाठी डिझाइन केली गेली आहे. महिंद्रा XUV400 नंतर BE6 ही त्यांची पुढची मोठी पायरी आहे.
डिझाइन आणि लूक (Design and Looks)
टाटा कर्व्ह
टाटा कर्व्हचे डिझाइन खूपच आकर्षक आहे, आणि तिची स्लीक कूपे-प्रेरित रूफलाइन, शार्प LED हेडलॅम्प्स व मोठी ग्रिल तिला रस्त्यावर आणखी जास्तच आकर्षक बनवतात. पण तिचे फ्रंट फेस टाटाच्या नवीन डिझाइन लँग्वेजवर आधारित आहे, जे हॅरियर आणि सफारीमध्येही तुम्हाला दिसते. 18-इंची अलॉय व्हील्स व स्थिर एरोडायनॅमिक्स बॉडी लाइन्स तिला आणखीच प्रीमियम लूक देतात. जर तुम्हाला स्टायलिश आणि आधुनिक गाडी हवी असेल, तर कर्व्ह तुमचे नेहमीच उत्तम पर्याय ठरेल.
महिंद्रा BE6
महिंद्रा BE6 चे डिझाइन थोडे वेगळे वाटेल, कारण ती कॉम्पॅक्ट आहे, असली तरी तिचा लूक व आक्रमक डिझाईन हे खूपच छान आहे. तिच्या उंच ग्राउंड क्लीयरन्स, चौकोनी हेडलॅम्प्स व स्कल्प्टेड बोनेटमुळे ती ऑफ रोडसाठी सुद्धा उत्तम ठरणार आहे. महिंद्राने खासकरून तिला तरुणांनासाठी आकर्षित करणारे स्पोर्टी टच दिले आहेत, जसे की तुम्हाला तिच्यात ड्युअल-टोन कलर ऑप्शन्स आणि 17-इंची अलॉय व्हील्स. ती कर्व्हएवढी स्लीक नाही, पण तिचे रफ अँड टफ प्लॅटफॉर्म वेगळेच आहे.
बॅटरी आणि रेंज (Battery and Range)
टाटा कर्व्ह
टाटा कर्व्हमध्ये तुम्हाला तुम्हाला 45-55 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे, जी तुम्हाला एकदा सिंगल चार्जवर साधारणतः ४३० ते ५०० किलोमीटरची रेंज देणार आहे. ही रेंज तुम्हाला शहरात व हायवेवर दोन्ही ठिकाणी वापरण्यासाठी पुरेशी आहे. तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार ८०% चार्ज कमीत-कमी ४० ते ५० मिनिटांत करते, तर घरी चार्ज केल्यावर पूर्ण चार्जिंगला जास्तीत-जास्त ७ ते ८ तास देखील लागु शकतात. तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी ही रेंज उत्तम ठरणार आहे.
महिंद्रा BE6
महिंद्रा BE6 मध्ये तुम्हाला 59-79 kWh बॅटरी आहे, जी ५५५ ते ६८० किलोमीटरची रेंज देते. कर्व्हच्या तुलनेत महिंद्रा BE6 ची रेंज कमी आहे, पण तिचे इंजिन आणि वजन ऑप्टिमायझेशनमुळे ती जास्त कार्यक्षम आहे. व फास्ट चार्जिंगने ३० ते ४० मिनिटांत ८०% चार्ज होते, आणि घरी चार्जिंगला साधारणतः ६ ते ७ तास लागु शकतात. त्यामुळे दैनंदिन रोजच्या वापरासाठी ही रेंज पुरेशी आहे.
परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग (Performance and Driving)
टाटा कर्व्ह
कर्व्हमध्ये तुम्हाला सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे जी तुम्हाला 150-167 हॉर्सपॉवर आणि 215 Nm टॉर्क जनरेट करते. त्यामुळे तिचे स्मूद एक्सलरेशन आणि स्थिर ड्रायव्हिंगचा अनुभव इलेक्ट्रिक गाडीचा खरा आनंद तुम्हाला मिळतो. ती 0-100 kmph वेग 8.6 सेकंदात गाठते, जो या सेगमेंटसाठी चांगला आहे. तिचे सस्पेंशन शहरातील खड्ड्यांवरही आरामदायी आहे, पण ऑफ-रोडिंगसाठी ती फारशी योग्य नाही.
महिंद्रा BE6
BE6 मध्ये तुम्हाला सिंगल मोटर सेटअप मिळतो, जो तुम्हाला 180-280 हॉर्सपॉवर व 380 Nm टॉर्क देते. जी तुम्हाला 0-100 kmph 6.7 सेकंदात गती मिळते, जे कर्व्हपेक्षा थोडे जलद आहे. तिचे हाय ग्राउंड क्लीयरन्स व मजबूत चेसिस तिला ऑफ-रोडींग करण्याची क्षमता देतात. शहरातही ती चपळ आहे, पण तिचे स्पोर्टी सस्पेंशन थोडे कडक वाटू शकते.
इंटिरिअर व फीचर्स (Interior and Features)
टाटा कर्व्ह
कर्व्हचे इंटिरिअर तुम्हाला खूपच सॉफ्ट व प्रीमियमनेस देते. यात तुम्हाला 10.25-इंच टचस्क्रीन मिळते, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ व व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखे फीचर्स तिला खास बनवतात. व तिची बूट स्पेस देखील 450 लिटरची आहे, जी परिवारासाठी खूप पुरेशी आहे. लेदर अपहोल्स्ट्री आणि सॉफ्ट-टच मटेरिअल्स तिला आणखी प्रीमियम फील देतात.
महिंद्रा BE6
BE6 चे इंटिरिअर तंत्रज्ञानावर जास्त भर देते. यात तुम्हाला 12.3-इंच टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS (Advanced Driver Assistance System) यांसारखी आधुनिक फीचर्स तिला आधुनिक बनवतात. तिची बूट स्पेस 400 लिटर आहे, जी कर्व्हपेक्षा नक्कीच थोडी कमी आहे, पण मात्र मागच्या सीट्स फोल्ड करून देखील जागा वाढवता येते. हे तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरणार आहे.
सुरक्षितता (Safety)
टाटा कर्व्ह
टाटा मुळात हि ओळखली जाते भारतात सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यामुळे टाटा कर्व्हला सुरक्षिततेत 5-स्टार रेटिंग आहे. कर्व्हमध्ये तुम्ह्स्ल्स 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल होल्ड कंट्रोल व रिव्हर्स कॅमेरा यांसारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. म्हणून तिची मजबूत बिल्ड क्वालिटी तुम्हाला अपघातात संरक्षण देते.
महिंद्रा BE6
महिंद्रा BE6 ने देखील भारत एन कॅप मध्ये 5-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. तिच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्ज, ADAS (लेव्हल 2), टायर प्रेशर मॉनिटरिंग व ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात.सुरक्षितता (Safety)
टाटा कर्व्ह
टाटा मुळात हि ओळखली जाते भारतात सुरक्षिततेच्या कारणासाठी त्यामुळे टाटा कर्व्हला सुरक्षिततेत 5-स्टार रेटिंग आहे. कर्व्हमध्ये तुम्ह्स्ल्स 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल होल्ड कंट्रोल व रिव्हर्स कॅमेरा यांसारखे सेफ्टी फीचर्स मिळतात. म्हणून तिची मजबूत बिल्ड क्वालिटी तुम्हाला अपघातात संरक्षण देते.
महिंद्रा BE6
महिंद्रा BE6 ने देखील भारत एन कॅप मध्ये 5-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. तिच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग्ज, ADAS (लेव्हल 2), टायर प्रेशर मॉनिटरिंग व ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. या कारणास्तव या दोन्ही गाड्या तुम्हाला उत्तम सुरक्षितता देतात. त्यामुळे कोणती गाडीची निवड करावी हे तुमच्यावर अवलंबून आहे.