महाराष्ट्रात महिलांच्या सबलीकरणासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन व विविध संस्था नेहमी प्रयत्नशील असतात. यातच एका अनोख्या आणि महत्वाकांक्षी योजनेची घोषणा नुकतीच केली आहे - श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने प्रस्तावित केली आहे, ती मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी हा एक खूप मोठा महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे.
➤ योजने बाबतीत?
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही एक अशी योजना आहे, जी महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलींसाठी आर्थिक आधार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेअंतर्गत, दरवर्षी 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाला जन्माला आलेल्या मुलींच्या नावावर 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) जमा केले जाणार आहे. हे पैसे मात्र मुलींच्या आईच्या खात्यावर जमा करण्यात येतील, कारण मुलीच्या भविष्यासाठी हि एक छोटीशी तरतूद करता येईल, म्हणून ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने व राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्याचा मानस ठेवला आहे,व हा प्रस्तावाला न्यास समितीने मान्य देखील केला आहे. ही योजना फक्त आर्थिक मदतच नव्हे, तर मुलींच्या जन्माला व त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल असे हे एक मोठे पाऊल योजनेच्या माध्यमातून एक मोठे पाऊल आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या जीवनात सकारात्मकता यावी म्हणून ही योजना एक नवीन मोठ्या आशेचा किरण ठरू शकते.
➤काय आहे या योजनेचे उद्दिष्ट?
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन का महत्त्वाचे आहे?
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही भरपूर ठिकाणी मुलगा-मुलगी असा भेदभाव आजही आहे. काही घरांमध्ये मुलीचा जन्माला आजही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात असतं, ज्यामुळे स्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. व अशा परिस्थितीतच, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे स्वागत करणे हे अधिक उत्तम ठरणार आहे. म्हणून श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना याचा मुख्य उद्देश हाच आहे. मुलींच्या जन्माला सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं व त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देऊन त्यांचे संगोपन करणे अधिक सोयीस्कर होणार.
➤शिक्षण व सक्षमीकरण
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेचा दुसरा उद्दिष्ट ते म्हणजे मुलींचे शिक्षण याला ते प्रोत्साहन देणे, म्हणजे 10,000 रुपये हे फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून जन्मलेल्या मुलींच्या आईच्या खात्यावर ठेवले जातील, कारण हेच पैसे मुलीच्या भविष्यासाठी - मग ते शिक्षणासाठी व इतर गरजांसाठी - वापरता येणार. शिक्षण हा सक्षमीकरणाचा मुख्य पाया आहे, आणि ही योजना मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक छोटा व महत्त्वाचा प्रयत्न ठरणार आहे.
➤या योजनेमुळे होणारे सामाजिक बदल.
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासोबतच ही योजना एक सामाजिक बदल देखील घडवून आणण्यासाठी फायदेशीर ठरेल. व जेव्हा कुटुंबांना असे वाटेल की मुलींच्या जन्मासोबतच त्यांना एक आर्थिक मदत देखील मिळते, तेव्हा कुठंतरी मुलींप्रती असलेला बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन हळूहळू बदलेल. व हा बदल समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत परिणाम करेल आणि मुलींना त्यांचे हक्क व संधी मिळवून देण्यास एक मोठी मदत या योजनेच्या माध्यमातून होईल.
➤ योजनेची अंमलबजावणी व पात्रता
➤ कशी राबवली जाणार हि योजना ?
श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट व राज्य सरकार या दोघांच्या अमोघ प्रयत्नाने राबवली जाणार आहे.ही योजना राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये लागू होणार. 8 मार्च रोजी जन्माला आलेल्या मुलींची नोंदणी करून त्यांच्या आईच्या खात्यावर 10,000 रुपये डिपॉझिट जमा केले जाणार.
➤ कोण पात्र ठरणार या योजनेसाठी?
➢ या योजनेसाठी काही अटी व निकष आहेत.
जन्मतारीख मुलीचा जन्म हा 8 मार्च रोजीच (जागतिक महिला दिन) शासकीय रुग्णालयात झाला असावा.
या योजनेच्या लाभ फक्त शासकीय रुग्णालयात जन्म झालेल्या मुलींनाच घेता येईल.
मुलीच्या जन्मावेळीच तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.
➤ फिक्स डिपॉझिटचा लाभ कसा मिळेल?
10,000 रुपये हे फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात ठेवले जातील, जे काही कालावधीनंतर - किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, तिला नाहीतर तिच्या कुटुंबाला मिळतील. हि रक्कम काही कालावधीनंतर व्याजासह वाढेल, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही आवश्यक गरजांसाठी आर्थिक मदत होईल.
➤ योजनेचे फायदे
या योजनेमुळे मुलींसाठी एक आर्थिक सुरक्षा निर्माण होईल.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा होणार कि मुलींसाठी आर्थिक सुरक्षेची हमी. व मुलींच्या जन्माच्या वेळी मिळणारी ही रक्कम संपूर्ण कुटुंबाला एक छोटासा आधार देईल व मुलीच्या भविष्यासाठी एक छोटीशी बचत होईल. व ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाणार, नाहीतर आरोग्य किंवा इतर आपात्कालीन गरजेसाठी वापरली जाईल.
टीप ➧ ही योजना फक्त आंतरराष्ट्रीय महिला दिवशी जन्माला आलेल्या मुलींसाठीच लागू आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होईल.