३६.००० च्या डाऊन पेमेंटने ने घरी आणा दमदार Royal Enfield Classic 650.

                  रॉयल एनफिल्ड च्या मोटारसायकल या भारतात किती प्रसिद्ध आहेत. हे भारतीयांना सांगण्याची काहीही नवीन गरज नाहीये. यातच नवीन लाँच झालेली रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 ही एक अशी मोटरसायकल आहे जी जुन्या काळातील डिझाईन व आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर योगदान घडवून आणते. मागच्या वर्षी २०२४ मध्ये हि बाईक इटलीतील मिलान ऑटो शोमध्ये  पहिल्यांदा दाखवण्यात आली होती. जी आता 2025 मध्ये लॉन्च झालेली ही बाइक रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी एक खास मोठी भेट आहे. या बाइकची किंमत 3.37 लाख ते 3.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे, जी तिच्या नवीन आलेल्या फीचर्स आणि ब्रँडच्या नावाच्या वारशाला साजेशी असणार आहे. ही  बाईक 648cc इंजिनसह येणारी ही बाइक तुम्हाला 47 हॉर्स-पावर व 52.3 Nm टॉर्क जनरेट करून देते, तर तिचा टॉप स्पीड सुमारे 1४० किमी/तास आहे व मायलेज २१.३० किमी प्रति लिटर असणार आहे. यात तुम्हाला ती ब्लॅक क्रोम, टील, ब्रंटिंगथॉर्प ब्लू व वल्लम रेड या चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. 

                       ही बाइक तुम्हाला ड्युअल-चॅनल ABS व रेट्रो-एनालॉग डॅशबोर्डसह येते.ही बाइक (Touring Bike) पर्याय म्हणून सुद्धा वापरू होऊ शकतो. कारण ही  बाईक लांबच्या प्रवासासाठी उत्तम असणार आहे, कारण तिची सीट व्यवस्था आरामदायक आहे व इंजिन शक्तिशाली काम करते. पण काही मोटारसायकल तज्ज्ञांच्या मते, तिचे 243 किलो वजन शहरातील वाहतूक (Traffic) कोंडीत थोडे जड जाऊ शकते.आणि पॉलिश्ड ट्विन एक्झॉस्टमुळे हि बाईक अधिक आकर्षक दिसते, यामुळे बाइकला एक आकर्षक आणि रॉयल लुक मिळतो.पिलियन सीट व सबफ्रेम हटवण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला आहे. सोलो राइडर्ससाठी ही बाइक अत्यंत अनुकूल आहे. 2009 मध्ये क्लासिक 350 लॉन्च झाली आणि ती एक यशस्वी मोटरसायकल ठरली. त्यानंतर क्लासिक 500 आली व त्यांनतर आता क्लासिक 650 ही या मालिकेतील नवीन पायरी हि बाईक आहे. ही बाइक जुन्या डिझाइनला आधुनिक तंत्रज्ञानासह खूपच आकर्षक आणि मस्क्युलर दिसते.  सादर करते, ज्यामुळे ती आजच्या काळातील रायडर्ससाठी परिपूर्ण बनते.

➤ कसा असणार आहे. क्लासिक ६५० चा लुक 




➤ क्लासिक लूक (Classic Look)

क्लासिक 650 चे लुक आणि डिझाइन म्हणजे रॉयल एनफिल्डच्या मूळ आत्म्याचे प्रतीक आहे. नेहमीप्रमाणे गोल हेडलॅम्प असणार, अश्रूच्या आकाराचे इंधन टँक  आहे. ड्युअल एक्झॉस्ट पॉलिश्ड पाइप्स तिला एक स्टायलिश लूक देतात. ब्लॅक क्रोम, टील, ब्रंटिंगथॉर्प ब्लू आणि वल्लम रेड हे चार रंग पर्याय तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. क्रोम फिनिशिंग, स्विचगिअर व व्हील हब्स यामुळे ती प्रीमियम वाटते.

जुन्या डिझाइनसोबतच यात काही आधुनिक बदलदेखील करण्यात आले आहेत, जसे की रुंद रियर फेंडर व मोठे पेट्रोल टँक. हे बदल तिला क्लासिक 350 पेक्षा भव्य बनवतात व रस्त्यावर तिची प्रेझेन्स जाणवते.


➤ फीचर्स 

इंजिन  क्लासिक 650 मध्ये 648 सीसीचे पॅरलल-ट्विन इंजिन तुम्हाला मिळते, ते मात्र तुम्हाला एअर-कूल्ड मिळते,जर तुम्हाला ग्राहकाला लिक्विड इंजिन मिळालं असत तर अधिक उत्तम झालं असत,कारण  एअर कुल्ड इंजिनमुळे बाईक इंजिन गरम होण्याची दात शक्यता असते.

➤ पॉवर                ➥     यात तुम्हाला 47.४ बीएचपी (हॉर्सपावर) जनरेट करून देते.

➤ टॉर्क                 ➥              52.3 एनएम टॉर्क

➤ RPM               ➥             ७,२५०

➤ गिअरबॉक्स   ➥      6-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर व असिस्ट क्लचसह.


➤ रेट्रो लूक  नेहमीप्रमाणे यातही तुम्हाला रेट्रो लूकमध्ये क्लासिक 650 ची डिझाईन क्लासिक 350 वर पूर्णपणे आधारित आहे, फक्त यात बदल हा आहे, हि बाईक क्लासिक ३५० पेक्षा अधिक मस्कुलर आहे व स्टायलिश डिझाइन आहे.

➤ हेडलाइट                 ➥       यात तुम्हाला गोलाकार एलईडी हेडलाइट मिळतो

➤ टेललाइट                    ➥        एलईडी टेललाइट

➤ पुढील सस्पेंशन        ➥        टेलिस्कोपिक फोर्क्स.

➤ मागचे  सस्पेंशन       ➥         ट्विन शॉक एब्जॉर्बर्स.

➤ ब्रेक                            ➥         पुढील आणि मागचे डिस्क ब्रेक, ड्युअल-चॅनल ABS सह.

➤ टायर्स                          ➥        ट्यूब असलेले स्पोक व्हील्स.

➤ चाकांची साइज        ➥  समोर 19 इंच आणि मागे 18 इंच.


➤ फीचर्स व  तंत्रज्ञान 

➤ इन्स्ट्रुमेंट क्लस्टर  यात तुम्हाला सेमी-डिजिटल डिस्प्ले दिले आहे, ज्यामध्ये स्पीडोमीटर, व गिअर पोझिशन इंडिकेटर आहेत.

➤ यूएसबी चार्जर: लांबच्या प्रवासा दरम्यान तुम्हाला मोबाइल चार्ज करण्यासाठी यूएसबी पोर्टची सोया केली आहे.

➤  इंधन टाकी आणि मायलेज

➤ इंधन टाकी क्षमता: 14.७ लिटर, जे लांब पल्ल्याच्या राइड्ससाठी पुरेसे आहे.

➤ मायलेज: तुम्हाला मायलेज हा 20-25 किमी/लिटर मिळणार. 

➤ रंग पर्याय:  पुढीलप्रमाणे रंग - Vallam Red, Bruntingthorpe Blue, Teal, आणि Black Chrome.

➤ किंमत ➥ ₹3,36,6००


➤टीप ➨ क्लासिक ६५० च्या व्हेरिएंटनुसार किंमत वाढेल. 



Previous Post Next Post